सांगली बाजार समितीत काँग्रेस आघाडीची सत्ता
By admin | Published: August 11, 2015 12:03 AM
राष्ट्रवादीचा धुव्वा : पतंगरावांच्या पॅनलला घवघवीत यश
राष्ट्रवादीचा धुव्वा : पतंगरावांच्या पॅनलला घवघवीत यश सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १९ पैकी १३ जागांवर विजय मिळवित माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.व्यापारी प्रतिनिधींच्या दोन, तर हमाल तोलाईदार मतदार संघातील एका जागेवर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार निवडून आले. निवडणुकीत जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी मंत्र्यांनी ताकद पणाला लावली होती.काँग्रेस आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य, शिवसेना व माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये भाजपा व माजी मंत्री मदन पाटील यांचा गट सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)---------------------सातार्यात सबकुछ राष्ट्रवादीच !सातारा आणि जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला. सातार्यात खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मनोमिलन पॅटर्न यशस्वी ठरला. जावळी-महाबळेश्वरमध्येही आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. मकरंद पाटील यांच्या पॅनेलने घवघवीत यश मिळवले.