स्पर्धा परीक्षा मोर्चाच्या बातमीला जोड
By admin | Published: February 29, 2016 10:03 PM
विद्यार्थी म्हणतात...
विद्यार्थी म्हणतात...नोकरी नाही तर छोकरी नाहीकाही वर्षांपूर्वी शासनातर्फे स्पर्धा परीक्षेच्या १८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात होती. त्यामुळे आपली उपनिरीक्षकपदावर निवड झाली. मात्र काही वर्षांपासून ५० ते ६० जागांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागत आहे. मेहनत घेऊन देखील त्यांना नोकरी मिळत नसल्याने त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.-संतोष आंबटकरपी.टी.उषा किंवा हुसेन बोल्ट नाहीतराज्य शासनाने पोलीस भरतीसाठी १६०० मीटर अंतरासाठी दिलेला वेळ हा ऑलम्पिक स्पर्धेतील खेळाडूंसाठी असलेल्या वेळेपेक्षा कमी आहे. भारतातील पी.टी.उषा किंवा अन्य खेळाडू इतक्या कमी वेळेत धावून पदक मिळवू शकल्या नाहीत. पोलीस भरतीसाठी अभ्यास करणारे तरुण व तरुणी काही पी.टी.उषा नाही किंवा हुसेन बोल्ट नाही. त्यामुळे केंद्राप्रमाणे धावण्याची मैदानी चाचणी घेण्यात यावी.- हर्षल कुलकर्णी स्वप्न पूर्ण होईनाआपण अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मात्र जागा कमी असल्याने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. जयेश पाटील, जळगावदोन वर्षापर्यंत ४०० ते ५०० जागांसाठी भरतीप्रक्रिया होत होती. सरकारकडून आर्थिक कारण पुढे करीत स्पर्धा परीक्षेसाठी जाहिरात काढली जात नाही. शासन वेळकाढूपणा करीत आहे.गणेश राजपूत, चोपडाबंदी उठवावीदोन वर्षांपासून अभ्यास सुरु आहे. एसटीआयच्या २०१५ पासून जागा नाही. यावर्षी ६२ जागांसाठी परीक्षा होत आहे. मागील वर्षी पोलीस भरती झाली नाही. वर्ग तीन व चार च्या भरतीवरील बंदी उठविण्यात यावी.भारती पवार, चोपडा.एमपीएससी परीक्षेचा निकाल वेळेवर लावण्यात यावा. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. वेळेत निकाल दिल्यास विद्यार्थ्यांना अन्य परीक्षेची तयारी करता येते.राजश्री कांबळे, सांगली