नवी दिल्ली : भारत-अमेरिकेने आज रविवारी संरक्षण रूपरेखा (डिफेन्स फे्रमवर्क अॅग्रीमेंट) हा द्विपक्षीय करार १० वर्षांसाठी आणखी वाढविण्यास सैद्धान्तिक सहमती दिली़ ड्रोन विमाने आणि लष्करी वाहतूक विमानांच्या उपकरणांच्या संयुक्त उत्पादनाच्या पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याच्या भारताच्या प्रस्तावावरही अमेरिकेने मोहोर लावली़ संरक्षण क्षेत्रातील सहकार्य एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेने घेतला असल्याचे मोदी यांनी ओबामा यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सांगितले़ आम्ही संरक्षण रूपरेखा कराराचे नूतनीकरण केले आहे़ सागरी सुरक्षा क्षेत्रातही परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय उभय देशांनी घेतला आहे़, असे ते म्हणाले़ संरक्षण क्षेत्रात सहकार्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या संरक्षण रूपरेखा कराराची मुदत या वर्षी संपणार होती़ २००५मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन अमेरिकन परराष्ट्रमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी स्वाक्षरी केली होती़
संरक्षण करार वाढविण्यास सहमती
By admin | Published: January 26, 2015 4:42 AM