कोची : विवाहितेला लग्नाचे खोटे वचन देऊन एखाद्या पुरुषाने तिच्या संमतीने शरीरसंबंध राखले तर तो बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या पुरुषाने विवाहितेला दिलेल्या वचनाची पूर्तता होणे कधीच शक्य नाही, याकडे कोर्टाने लक्ष वेधले आहे. न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी हा निकाल दिला.
पीडित महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले होते की, तिची व आरोपीची ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीगाठी होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी लग्न करायचे ठरविले. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. मात्र, या कालावधीत त्यांच्यात परस्पर संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते.