'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:00 IST2025-04-10T17:57:44+5:302025-04-10T18:00:14+5:30

मोदी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली नाही किंवा कोणतेही नवीन यश मिळवले नाही, असं पी. चिदंबरम म्हणाले.

Consequences of UPA government's strategic diplomacy P Chidambaram clearly stated on Tahawwur Rana's extradition | 'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले

'UPA सरकारच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीचे परिणाम', तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर पी चिदंबरम यांनी स्पष्टच सांगितले

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

पी चिदंबरम म्हणाले की, २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक तहव्वूर हुसेन राणा याला १० एप्रिल २०२५ रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले याचा मला आनंद आहे, परंतु संपूर्ण गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे. मोदी सरकार याचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत असताना, सत्य त्यांच्या दाव्यांपासून खूप दूर आहे.

26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात

पी चिदंबरम म्हणाले की, हे प्रत्यार्पण म्हणजे अमेरिकेशी समन्वय साधून यूपीए सरकारने सुरू केलेल्या, नेतृत्व केलेल्या आणि टिकवलेल्या दीड दशकाच्या कठोर, परिश्रमशील आणि धोरणात्मक राजनैतिक कूटनीतिचा कळस आहे. या दिशेने पहिली मोठी कारवाई ११ नोव्हेंबर २००९ रोजी झाली, ज्यावेळी एनआयएने डेव्हिड कोलमन हेडली, तहव्वूर राणा आणि इतरांविरुद्ध नवी दिल्लीत गुन्हा दाखल केला. त्याच महिन्यात, कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतासोबत गुप्तचर सहकार्याची पुष्टी केली, जी यूपीए सरकारच्या हुशार परराष्ट्र धोरणाचा थेट परिणाम होती, असंही पी चिदंबरम म्हणाले. 

यूपीए सरकारने त्यावेळी निर्णयावर जाहीरपणे निराशा व्यक्त केली

"२००९ मध्ये कोपनहेगनमध्ये झालेल्या अयशस्वी दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात लष्कर-ए-तैयबाला मदत करत असताना एफबीआयने राणाला शिकागो येथून अटक केली. जून २०११ मध्ये अमेरिकन न्यायालयाने त्याला २६/११ हल्ल्यात थेट सहभाग असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले, परंतु इतर दहशतवादी कट रचल्याबद्दल त्याला दोषी ठरवले आणि त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यूपीए सरकारने या निर्णयावर जाहीरपणे निराशा व्यक्त केली आणि राजनैतिक दबाव कायम ठेवला, असंही पी चिदंबरम म्हणाले.

Web Title: Consequences of UPA government's strategic diplomacy P Chidambaram clearly stated on Tahawwur Rana's extradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.