भूज : गुजरातला बदनाम करण्याचा, या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे काही जणांनी कारस्थान रचले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले की, कारस्थानी लोकांच्या प्रयत्नांकडे गुजरातने दुर्लक्ष केले व हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे.गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कच्छ जिल्ह्यातील ४४०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांच्या कामांचा मोदी यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला. ते म्हणाले की, कितीही अडचणी आल्या तरी २०४७ साली भारत हा विकसित देश म्हणून उदयाला येईल. आपत्ती व्यवस्थापन लागू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे. (वृत्तसंस्था)
गुजरातला बदनाम करण्याचे काहींचे कारस्थान, पंतप्रधान नरेंद्र मोदींंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 6:55 AM