आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 06:20 AM2024-01-30T06:20:11+5:302024-01-30T06:21:27+5:30
Rahul Gandhi : यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
नवी दिल्ली - यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ४५ विद्यापीठांतील ७,००० आरक्षित पदांपैकी ३,००० जागा रिक्त असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजप-आरएसस आता उच्च शिक्षण संस्थांतील वंचितांच्या वाट्याच्या नोकऱ्या हिसकावू इच्छिते. ही सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या नायकांच्या स्वप्नांची हत्या आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
ते देशात हिंसाचार व द्वेष पसरवत आहेत
“ते (संघ आणि भाजप) लोकांना धर्म, जात व भाषेच्या नावावर आपसात भांडायला लावतात. भाऊभावाशी भांडत आहेत... त्यांनी देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत केला.