नवी दिल्ली: दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जामीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून साखर वाढवल्याचा दावा ED ने केला आहे. या दाव्यानंतर आता दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेन यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवालांबद्दल ईडीने कोर्टात खोटी दावा केला. केजरीवालांना घरी बनवलेल्या जेवणाचा पुरवठा रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष ईडीच्या माध्यमातून हा कट रचला. केजरीवालांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपही आतिशी यांनी यावेळी केला आहे.
संबधित बातमी- जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत; ED चा कोर्टात दावा
आतिशी म्हणाल्या, सर्वांना माहित आहे की, अरविंद केजरीवाल यांना गेल्या 30 वर्षांपासून मधुमेह आहे आणि त्यांची साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज 54 युनिट्स इन्सुलिन घेतात. कोणत्याही डॉक्टरांना विचारा की, एवढ्या प्रमाणात इन्सुलिनची मात्रा अत्यंत गंभीर मधुमेह असलेल्या व्यक्तीला दिली जाते. अरविंद केजरीवाल यांनी वारंवार विनंती करुनही त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. केजरीवाल यांना त्यांच्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करायची असेल तर ईडी त्याला विरोध करते, कारण तुम्हा लोकांना केजरीवालांना मारायचे आहे. भाजप केजरीवालांना निवडणुकीत पराभूत करू शकले नाही, त्यामुळे त्यांचा जीव घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
आतिशी पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्याने केजरीवालांना तुरुंगात घरचे अन्न खाण्याची परवानगी मिळाली. पण, भाजप आपल्या तपास एजन्सी ईडीच्या मदतीने केजरीवालांना घरी बनवलेले अन्न खाण्यापासून रोखत आहे. केजरीवाल गोड चहा पीत आहेत, मिठाई खात आहेत, हे ईडीचे दावे पूर्ण खोटे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एरिथ्रिटॉल(स्वीटनर) टाकलेले चहा आणि मिठाई केजरीवालांना दिली जात आहे.
इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'
ईडीने आणखी एक दावा केला की, साखरेची पातळी वाढवण्यासाठी केजरीवाल केळी आणि चॉकलेट खात आहेत. मी ईडीला सांगू इच्छिते की, कोणत्याही मधुमेहाच्या डॉक्टरांशी बोला, प्रत्येकजण आपल्या रुग्णांना दोन गोष्टी सोबत ठेवण्यास सांगतो. एक केळी आणि दुसरे चॉकलेट. ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश वाचला तर त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, केजरीवालांना तुरुंगात नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारची टॉफी आणि केळी देणे आवश्यक आहे. ईडी केजरीवालांना दिले जाणारे घरचे जेवण थांबवण्यासाठी हे सर्व खोटे दावे करत आहे. घरातील जेवण बंद झाले, तर तिहार तुरुंगात त्यांना काय आणि केव्हा खायला दिले जाईल, हे कोणालाही कळणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.