चेन्नई - तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक-भाजपा युतीने लोकसभा निवडणुकांसाठी समझोता केल्यानंतर या दोन्ही पक्षांत कोणी कोणत्या मतदारसंघांत उमेदवार लढवायचे, हेही निश्चित केले. आधीच झालेल्या जागावाटपानुसारअण्णा द्रमुक २० तर भाजपा ५ जागा लढविणार आहे. उर्वरित जागा या युतीतील इतर घटक पक्षांना देण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम, तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष सौंदरराडजन, भाजपा नेते एच. राजा यांच्या उपस्थितीत मतदारसंघांची घोषणा करण्यात आली. तामिळनाडूत लोकसभेच्या ४० जागा आहेत. वेल्लोर वगळता २० ठिकाणी अण्णाद्रमुक आपले उमेदवार उभे करणार आहे. वेल्लोरची जागा न्यू जस्टिस पार्टी लढविणार आहे. तब्बल दहा वर्षानंतर पतळी मक्कल कच्ची (पीएमके) पक्ष युतीत परतला आहे. पीएमकेसाठी ७ जागा सोडण्यात आल्या आहेत.कन्याकुमारी, धर्मपुरी, कोइम्बतूर, तुतुकोडी (तुतुकोरिन), रामनाथपुरम या लोकसभा जागांवर भाजपा आपले उमेदवार उभे करेला. अण्णाद्रमुक-भाजपा युतीतील मित्रपक्ष डीएमडीके पक्षाला चार तर तामिळ मनिला काँग्रेस (मुपनार), पुतिया तामिळघम (पीटी), आॅल इंडिया एन. आर. काँग्रेस (एआयएनआरसी) या पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली. गेल्यावेळी अण्णाद्रमुकचे ३७ तर भाजपा, पीएमके, एनआयएनआरसी पक्षाचा प्रत्येकी एक खासदार निवडून आला होता. (वृत्तसंस्था)१७ जागांवर पाणीअण्णा द्रमुकने २0१४ च्या लोकसभा निवडणुकांत ४0 पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. तरीही त्या पक्षाने यंदा २0 जागा लढवण्याचे ठरविले. म्हणजे गेल्या वेळी विजयी झालेल्या १७ मतदारसंघांत अण्णा द्रमुकचे उमेदवार नसतील.
अण्णाद्रमुक व भाजपाने ठरवले आपले मतदारसंघ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 5:56 AM