ग्राहक न्यायालय
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
दिवाणी न्यायालयातील प्रलंबित
दिवाणी न्यायालयातील प्रलंबितप्रकरण ग्राहक न्यायालयात चालवलेन्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग : प्रकरण खारीजनागपूर : अमरावती मार्गावरील हिंदुस्तान कॉलनी येथील सुमन कॅसलचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले एक प्रकरण ग्राहक मंचापुढे चालविल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मनोहर चिलबुले, सदस्य मंजुश्री खनके व प्रदीप पाटील यांनी तक्रारकर्त्यावर न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग, असा शेरा मारत हे प्रकरण खारीज केले. सिद्धेश्वर पंचाप्पा हवा, असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी ९ मे २०११ रोजी बिल्डर सुनील विशम्बरनाथ तिवारी, जमीनमालक बाजारगाव पेपर मिल्स आणि सदनिकाधारक शर्मिष्ठा पचेरीवाला यांच्याविरुद्ध ग्राहक मंचापुढे तक्रार केली होती. तक्रारकर्त्याने सुमन कॅसलमधील दोन सदनिका नोंदणीकृत विक्रीपत्र करून खरेदी केल्या होत्या. पुढे त्यांनी ग्राहक मंचापुढे तक्रार करून सुमन कॅसलचे बांधकाम गैरकायदेशीरपणे करण्यात आले आहे. ही बाब सेवेतील त्रुटी म्हणून घोषित करण्यात यावी, अनधिकृत आणि गैरकायदेशीर बांधकाम काढून मंजूर नकाशाप्रमाणे सदनिका संकुल करण्याचा आदेश व्हावा, बांधकाम पूर्णत्वाचे व सदनिका वापरण्याचे प्रमाणपत्र आणण्याचा आदेश व्हावा, मानसिक व शारीरिक त्रासाचा मोबदला मिळावा, असेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते. तक्रारकर्त्याने याच तक्रारीतील मुद्यांच्या आधारावर न्यायालयात ५१७/११ क्रमांकाचा दिवाणी दावा दाखल केेला आहे. तो प्रलंबित आहे. मंचापुढे तक्रारकर्त्याच्या वतीने ॲड. पी. व्ही. कुळकर्णी, बिल्डरच्या वतीने ॲड. के. डी. शुक्ला, पचेरीवाला यांच्यावतीने ॲड. अतुल पांडे यांनी काम पाहिले.