नवी दिल्ली - टोमॅटोच्या किमती बाजारात २०० रुपये प्रति किलो रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे केंद्र सरकारने बुधवारी नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोची विक्री केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना फायदा?ज्या ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन होते तेथे अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे यंदा टोमॅटोच्या दरात पाचपट वाढ झाली. जून-जुलैत टोमॅटोचे भाव वाढतात, मात्र यावेळी महागाईचा प्रभाव अधिक आहे. टोमॅटोच्या ४४५% भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जेव्हा पीक आले तेव्हा ५ रुपये किलोने टोमॅटोची विक्री करावी लागली होती.
विक्री कुठे होणार? ज्या ठिकाणी किरकोळ किमती सरासरीपेक्षा जास्त व विक्री अधिक हाेते अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोची विक्री केली जाईल.
नाशिकचे टोमॅटो दर कमी करणार? नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पीक येण्याची अपेक्षा असल्याने किमती उतरण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.