कोलकाता : ‘चर्चेसाठी या, तुमच्या सर्व योग्य मागण्या मान्य करू, पण संप मागे घ्या,’ हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आवाहन संपकरीडॉक्टरांनी शनिवारी फेटाळून लावले. मुख्यमंत्री माफी मागेपर्यंत व जखमी डॉक्टरांच्या भेटीला येईपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. तरीही सरकारने कुणावरही सक्त कारवाई केली नाही, एस्मा कायदा लावला नाही. दोन दिवस चर्चेला बोलावूनही घटनात्मक प्रमुखांकडे बैठकीस न येण्याची डॉक्टरांची भूमिका आडमुठी आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.मागण्या मान्य न केल्यास सरकारी डॉक्टर सोमवारी देशव्यापी बंद पाळणार आहेत. बंद टाळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तर सरकार चर्चेला बोलावून संपात फूट पाडू पाहत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरांच्या दोन संघटनांपैकी एक भाजपशी संबंधित अभाविप तर दुसरी मार्क्सवाद्यांशी संबंधित एसएफआयची आहे. हल्ले खपवून घेऊ नकाया प्रकाराची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेऊ नका, हल्लखोरांवर कारवाई करा, असे पत्रात म्हटले आहे.
संपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:29 AM