कानपूर :अखिलेश यादव यांचा सहकारी पीयूष जैन याच्या घरी जीएसटी व प्राप्तिकर खात्याने मारलेल्या छाप्यात सुमारे १५० कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नाेटा माेजण्यासाठी अधिकाऱ्यांना सहा यंत्रे न्यावी लागली. जैन यांचे कन्नाैज येथील घर सील करून मुलगा प्रत्युषला अटक करण्यात आली आहे.
जैनने अलिकडेच ‘समाजवादी अत्तर’ लाँच केले हाेते. त्याच्या नावावर सुमारे ४० कंपन्या आहेत. त्यात काही शेल कंपन्यांचा समावेश आहे. नाेटांनी भरलेल्या कपाटांमध्ये ५०० रुपयांची बंडले हाेती.
कंटेनरमधून नेली रक्कम
जैन यांचे मुख्यालय मुंबईत असून, कन्नाैज आणि कानपूर येथे कार्यालये आहेत. तेथेही छापे मारण्यात आले. जीएसटी इंटेलिजन्सने प्रथम छापे टाकले. तिथे आढळलेली राेख रक्कम पाहून कारवाईत प्राप्तिकर खात्याला सहभागी करून घेण्यात आले. जप्त रक्कम कंटेनरमधून आरबीआयमध्ये नेली.
पानमसाल्याचे अत्तर कनेक्शन
दोन दिवसांपूर्वी शिखर पान मसालावर छापे मारले हाेते. त्यातून सुपारी व्यापारी के.के. अग्रवाल आणि पीयूष जैन यांच्याबाबत टीप मिळाली हाेती. शिखर पानमसाला, पीयूष जैन व अग्रवाल हे व्यापारी एकमेकांशी संबंधित आहेत.