शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हायकोर्टाचा अवमान; जिल्हाधिकाऱ्यांना कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 5:49 AM

जमीन अधिग्रहणात स्टे असताना कारवाई

खुशालचंद बाहेती

चेन्नई : जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही ती ताब्यात घेऊन त्यावर काम केले आणि न्यायालयीन आदेशाचा अवमान केला म्हणून दोषी धरत मद्रास उच्च न्यायालयानेजिल्हाधिकारी, सहजिल्हाधिकारी आणि जमीन अधिग्रहण अधिकाऱ्यांना तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली.

सन २०१८ मध्ये राजन्ना सिरसिल्ला (पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याच्या भाग) जिल्ह्यात अनंतागिरी साठवण तलावासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आली होती. ती काढताना ग्रामसभेचे आयोजन, महसुली अभिलेख अद्ययावतीकरण आक्षेप घेणाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेणे या अनिवार्य प्रक्रिया पार पाडल्या नाहीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई व पुनर्वसनाचा अधिकार कायद्याप्रमाणे जमिनीचे दर निश्चित केले नाहीत, असाही आक्षेप होता. उच्च न्यायालयाने यास अंतरिम स्थगिती देत अधिग्रहणाची कारवाई थांबवली. मात्र, यानंतरही काम न थांबवता शेतकऱ्यांना पोलिसांकडून धमकावण्यात आले आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये गोदावरी प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे जमिनी पाण्यात गेल्या. हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची याचिका शेतकऱ्यांनी दाखल केली.या प्रकरणात उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्यासह सहजिल्हाधिकारी, जमीन अधिग्रहण अधिकारी या ३ अधिकाऱ्यांना दोषी ठरवत ३ महिने साधी कैद व प्रत्येक २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याशिवाय प्रत्येक अर्जदार शेतकऱ्यास १० हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांची बाजू  nस्थगिती दिली तेव्हा २०१८ मध्ये ते कार्यरत नव्हते. त्यांनी नंतर पदभार घेतला. स्थगितीतील जमीन अधिग्रहण केलेली नाही. 

उच्च न्यायालयाचे निरीक्षण

nजमिनी पाण्याखाली गेल्या तेव्हा जिल्हाधिकारी पदावर होते. नंतर पदभार घेतला असला तरीही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्यांचे कर्तव्य आहे.

nपाण्याखाली गेलेल्या जमिनीचे फोटो पाहता, जमीन अधिग्रहण केली नाही, हे म्हणणे खोटे आहे.   

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी