शिक्षण संचालकांच्या सूचना धुडकावून शाळांचे प्रवेश सुरू
By admin | Published: December 20, 2014 10:26 PM
शिक्षण संचालकांच्या सूचना धुडकावून शाळांचे प्रवेश सुरू
शिक्षण संचालकांच्या सूचना धुडकावून शाळांचे प्रवेश सुरूमनविसेची शाळांवर कारवाई करण्याची मागणीमुंबई :राज्यातील पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रवेशावरून दरवर्षी गोंधळ उडतो. हा गोंधळ थांबविण्यासाठी शिक्षण संचालकांनी यंदा नव्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याची सूचना राज्यातील शाळांना केली आहे. या आदेशाला केराची टोपली दाखवत मुंबईतील अनेक शाळा प्रशासनांनी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. याप्रकरणी संबंधीत शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी मनविसेने शिक्षण संचालकांकडे केली आहे.पूर्व प्राथमिक वर्गाच्या (नर्सरी, केजी) प्रवेशासाठी पालकांची होणारी फरपट थांबविण्यासाठी या वर्गाचे प्रवेश शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी एक महिन्याच्या कालावधीत करावे, याबाबत राज्य शिक्षण संचालकांनी शाळांना सुचना दिल्या आहेत. तसेच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करून त्यानुसार सर्व शाळांनी प्रवेश करावेत, अशाही सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र याकडे शाळांनी पूर्णपणे दुर्लक्ष करत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईतील वडाळा, माटुंगा, दादर तसेच मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक नामांकित शाळांनी आपल्या प्रवेश प्रक्रियेची जाहिरात देण्यास सुरुवात केली आहे.शाळांमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याची तक्रार पालकांनी मनविसेकडे केली आहे. त्यामुळे मुलांच्या शाळा प्रवेशासाठी होणारी पालकांची ससेहोलपट थांबविण्याबाबत शिक्षण संचालनालयाने तातडीने निर्णय घ्यावा, असे मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सांगितले.