लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माेदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील आणखी एक माेठे कंत्राट लार्सन ॲण्ड टुब्राे या कंपनीला मिळाले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर ८७.५६९ किमीचा मार्ग कंपनी उभारणार आहे. बुलेट ट्रेनच्या एकूण मार्गापैकी ३२४ किमी मार्गाचे काम एल ॲण्ड टीला मिळाले असून, हे संपूर्ण काम गुजरातमधील आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेनचा एकूण ५०८ किलाेमीटर लांबीचा प्रकल्प आहे. यापैकी १५५.७६ किमी मार्ग महाराष्ट्रात, ४.३ किमी मार्ग दादरा आणि नगर हवेलीमध्ये आणि ३४८ किलाेमीटरचा मार्ग गुजरातमध्ये आहे. मार्गावर एकूण १२ रेल्वे स्थानके राहणार आहेत. एल ॲण्ड टी कंपनीला या मार्गावरील एमएएचएसआर-सी६ पॅकेजचे कंत्राट मिळाले आहे.
बडाेदा ते अहमदाबाद असा हा मार्ग राहणार असून, या मार्गावर आनंद किंवा नाडियाड येथे एक स्थानक राहणार आहे. संपूर्ण रेल्वेमार्ग उभारणी, रेल्वे पुलांचे बांधकाम, देखीभालीसाठी डेपाे इत्यादी कामांची पूर्तता कंपनीला करावी लागणार आहे.
झराेली गावापासून बडाेद्यापर्यंत मार्गn यापूर्वी एल ॲण्ड टी कंपनीला गुजरातमधील २३७ किलाेमीटर रेल्वेमार्गाचे कंत्राट मिळाले हाेते. एमएएचएसआर-सी४ या पॅकेजअंतर्गत महाराष्ट्र सीमेवरील झराेली गावापासून बडाेदापर्यंतचा हा मार्ग आहे. वापी, बिलिमाेरा, सुरत आणि भडाेच अशी स्थानके आहेत. nएल ॲण्ड टीला आतापर्यंत सात हजार काेटींच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. विशेष म्हणजे, गुजरातमधील कामापैकी एकूण ३२४ किमी मार्गाचे काम कंपनीला मिळाले.