बक्सर मृतांच्या संख्येबाबत दोन अहवालात विरोधाभास; पाटणा हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 07:10 AM2021-05-19T07:10:35+5:302021-05-19T07:10:52+5:30

अधिकृत वेबसाईटवर मृत्यू आणि जन्मनोंदणीसंबंधी माहिती अद्ययावत नसल्यावरूनही राज्य सरकारला फटकारले.

Contradictions in two reports on the number of Buxar deaths; Question mark of Patna High Court | बक्सर मृतांच्या संख्येबाबत दोन अहवालात विरोधाभास; पाटणा हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह

बक्सर मृतांच्या संख्येबाबत दोन अहवालात विरोधाभास; पाटणा हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह

googlenewsNext

बक्सर (बिहार) : गंगा नदीत मृतदेह आढळल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  पाटणा उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या  दोन अहवालातील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित करून  पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १९ मेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

बिहारच्या मुख्य सचिवांच्या अहवालात कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि पाटणा विभागीय आयुक्तांनी नमूद केलेली बक्सर स्मनशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या यात ताळमेळ लागत नाही.  अधिकृत वेबसाईटवर मृत्यू आणि जन्मनोंदणीसंबंधी माहिती अद्ययावत नसल्यावरूनही राज्य सरकारला फटकारले.  खंडपीठाने सोमवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना उपरोक्त निर्देश दिले. 

आकडे बोलतात
मुख्य सचिवांच्या अहवालात १ मार्च ते १३ मेपर्यंत कोरोनामुळे बक्सरमध्ये फक्त सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार ५ ते १४ मेपर्यंत बक्सर येथील स्मशानभूमीत ७८९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोर्टाने सरकारला बक्सर  जिल्ह्यात कोरोनाने विविध गटातील किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत स्पष्टीकरणांसह गुरुवारी पुन्हा उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 

Web Title: Contradictions in two reports on the number of Buxar deaths; Question mark of Patna High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.