नवी दिल्ली : भूमी अधिग्रहण, कोळसा क्षेत्रासह ६ वादग्रस्त वटहुकमांच्या प्रती सोमवारी सभागृहात ठेवण्यात आल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केल्यामुळे गदारोळ झाला. अभिभाषणानंतर लोकसभेत संसदीय कार्य राज्यमंत्री राजीवप्रताप रूडी यांनी वटहुकमाच्या प्रती सादर केल्या.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २० मार्च रोजी संपत असून तत्पूर्वी वटहुकमासंबंधी विधेयक पारित करण्यासाठी सरकारने प्रयत्न चालविला आहे. तृणमूलच्या खासदारांनी ‘आॅर्डिनन्स राज’ संपवा अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. भूमी अधिग्रहण, विमा क्षेत्रातील एफडीआय, कोळसा खाणपट्ट्यांचा लिलाव, ई-रिक्षा तसेच रिक्षाच्या दर्जासंबंधी सुधारणा खाण व खनिज आणि नागरिकत्व कायद्यात सुधारणा या सहा वटहुकुमाचे भवितव्य चालू अधिवेशनात ठरणार आहे.
वादग्रस्त ६ वटहुकूम लोकसभेत सादर
By admin | Published: February 23, 2015 11:21 PM