नवी दिल्ली- वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक आज भारतात येणार आहे. मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रक्षोभक भाषणे करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अंमलबजावणी संचालनालया (ईडी)नं संयुक्तरीत्या कारवाई करण्याची झाकीर नाईकला भीती होती. त्यामुळेच तो परदेशात परागंदा झालाय.अखेर मलेशिया सरकारनं झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.
वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक भारतात येणार?; मलेशिया सरकारची प्रत्यार्पणाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 14:19 IST