बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलाताना विधानसभेत असे वक्तव्य केले, ज्याचे पडसाद केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशात उमटत आहेत. भाजपने नितीश यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या डोक्यात आजकाल बी ग्रेड फिल्म सुरू असल्याचेही भाजपने म्हटले आहे. याच वेळी, नितीश कुमार यांचे असले बोलणे एकून बिहार विधानसभेतील एक महिला आमदार सभागृहातून बाहेर आल्या आणि ढसा-ढसा रडल्या.
नितीश कुमारांच्या वक्तव्यानंतर महिला आमदारांना रडू कसळलं -खरे तर नितीश कुमार जेव्हा यासंदर्भात बोलत होते, तेव्हा सभागृहातील सर्वच सदस्य अस्वस्त झाल्याचे दिसून आले. भाजप आमदार निवेदिता सिंह तर ढसा-ढसा रडल्या. यानंतर, त्यांनी सभागृहाबारहेर येऊन पत्रकारांसोबत संवाद साधला. नितीश यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाला आहे. सभागृहात त्यांचे भाषण ऐकण्याची माझी हिंमत झाली नाही आणि मी बाहेर आले, असे त्यंनी म्हटले आहे.
नितीश यांच्याव निशाणा साधताना भाजपने ट्विट केले आहे की, "भारतीय राजकारणात नितीश बाबूंसारखा अश्लील नेता बघितला नसेल. नितीश बाबूंच्या डोक्यात अॅडल्ट "B" Grade चित्रपटांचा किडा शिरला घुसला आहे. सार्वजनिकपणे यांच्या द्विअर्थी संवादावर बंदी घालायला हवी. संगतीचा रंग चढल्यासारखे वाटत आहे."
मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते - नितीश कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. नितीश यांच्या या वक्तव्यानंतर, आता राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगानेही भाष्य केले आहे. 'या देशातील प्रत्येक महिलेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने, मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते. विधानसभेतील त्यांचे असभ्य वक्तव्य, हे प्रत्येक महिलेच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अपमान आहे. त्याची भाषा अत्यंत अपमानास्पद आणि घाणेरडी आहे. जर लोकशाहीत एखादा नेता उघडपणे अशा स्वरुपाचे भाष्य करत असेल, तर राज्यातील महिलांची काय स्थिती असेल, याची कल्पना येऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते नितीश - चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."