कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता टीपू (Tipu) चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला आहे. खरे तर, तोंडाला काळे फासलेले 'टीपू' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात म्हैसूरच्या राजाचे सत्य समोर आणण्याचा दावा करण्यात येत आहे. हा चित्रपट संदीप सिंह (Sandeep Singh) आणि रश्मी शर्मा यांचा आहे. यासंदर्भात बोलताना चित्रपट निर्माता संदीप सिंह म्हणाले, आपण म्हैसूरच्या राजाचे सत्य समोर आणणार आहोत. जेव्हा मी टिपू सुल्तानचे सत्य समजून घेतल्यानंतर, थक्क झालो होतो. टिपूच्या स्टोरीने माझ्या अंगावर शहारे आले होते. मला वाटते की, अत्याचारी टिपू सुल्तान काय होता हे लोकांना माहीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे हा चित्रपट 70mm वर प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे.
'टिपू' चित्रपट तयार करण्याचा उद्देश? - चित्रपट निर्माता संदीप सिंह म्हणाले, खरे तर, टिपू हा सुल्तान म्हणवण्याच्याही लायकीचा नाही. विश्वास ठेवण्यासाठी माझे ब्रेनवॉश करण्यात आले होते. जसे की, आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात सांगण्यात आले आहे की, तो एक पराक्रमी व्यक्ती होता. पण त्याची क्रूर बाजू कुणालाही माहीत नाही. मी भविष्यातील पिढ्यांसाठी त्याची अधःकारातील ही बाजू समोर आणू इच्छित आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीत हनुमान चालिसा - तर दुसरीकडे कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीचा आवाज तीव्र होताना दिसत आहे. आज भाजप सायंकाळी 7 वाजता संपूर्ण राज्यात हनुमान चालिसेचे पठण करणार आहे. कर्नाटकात बजरंग दल रस्त्यावर उतरला आहे. प्रत्येक शहरात हनुमान चालिसाचे पठण करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे राज्यातील राजकारण अधिक तापले आहे.
बजरंग दलाने अनेक भागांत रस्त्यावर उतरून हनुमान चालिसा पठण केले आहे. एवढेच नाही, तर आज सायंकाळी 7 वाजताही हनुमान चालिसेचे आयोजन करण्यात आले आहे.