वडोदरा: परकीय निधीच्या मदतीने एका ट्रस्टने शेकडो तरुणींचे धर्मांतर(Conversion) केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुजरातच्या(Gujarat) वडोदरा येथे 100 ते 200 हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर इस्लाममध्ये धर्मांतर करुन त्यांचे लग्न लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वडोदरा पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात धार्मिक ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर परदेशी निधीद्वारे लोकांना अवैधरित्या इस्लाममध्ये धर्मांतरित करणे, मशिदी बांधणे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलकांना मदत करणे आणि दिल्ली दंगलीचा आरोप आहे. या 1860 पानांच्या आरोपपत्रात, 5 आरोपींची नावे आहेत.
आरोपपत्रात पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद उमर गौतम हा दिल्लीचा रहिवासी असून त्याने 100 ते 200 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचे लग्न लावून दिले होते. याशिवाय वडोदरास्थित AFMI चॅरिटेबल ट्रस्टचा व्यवस्थापकीय विश्वस्त सलाहुद्दीन शेख याच्यावर ट्रस्ट फंडाच्या मदतीने विविध समुदायांतील सुमारे 1,000 लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
दोन आरोपी फरार
पोलिसांनी सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारलेल्यांमध्ये सुमारे 10 लोक बहिरे आहेत ज्यांना ऐकू येत नाही. त्याचवेळी शेखकडे काम करणारा गौतम, शेख आणि मोहम्मद मन्सूरी यांना या प्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. वडोदरा पोलिसांनी भरूच जिल्ह्यातील रहिवासी असलेला लंडनस्थित अब्दुल्ला फफडावाला आणि यूएईचा रहिवासी मुस्तफा थानावाला यांना फरार घोषित केले आहे.
गौतमला यापूर्वी अटक केलेलोकांची फसवणूक करुन इस्लाममध्ये धर्मांत केल्याप्रकरणी यूपी एसटीएफने या वर्षी जूनमध्ये गौतमला अटक केली होती. याप्रकरणी ऑगस्टमध्ये वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने शेख, गौतम आणि इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ज्यामध्ये विविध समुदायांमध्ये धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन देणे, खोट बोलून गुन्हेगारी कट रचणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.