लखनौ : केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे मान्य नाही, अशी भूमिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे. तथापि, विवाहानंतर तीन महिन्यांनी सुरक्षेची मागणी करणाऱ्या एका जोडप्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यासही न्यायालयाने नकार दिला.याप्रकरणी याचिका करणारी महिला मुस्लिम आहे; पण एका हिंदू पुरुषाशी विवाह करण्यासाठी तिने विवाहापूर्वी एक महिना अगोदर हिंदू धर्म स्वीकारला होता. दरम्यान, महेशचंद्र त्रिपाठी यांच्या एकल पीठाने ही याचिका फेटाळून लावली. आपल्या नातेवाइकांनी वैवाहिक जीवनात हस्तक्षेप क: नये, यासाठी निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या क्षेत्रातील संबंधित कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मात्र न्यायालयाने खुला ठेवला आहे.
लव्ह जिहादवर लगाम लावण्यासाठी कायदा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, लव्ह जिहादवर लगाम लावण्यासाठी लवकरच एक कायदा आणणार आहोत.