शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

युवकांना शेतीशी जोडून उत्पन्न दुप्पट करण्यावर विचारमंथन

By admin | Published: March 20, 2017 3:39 AM

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न

बलवंत तक्षक / चंदीगडपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पटियाळा जिल्ह्यातील रखडा गावात कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमधून होणारे उत्पन्न आणि हे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्यावर राजू श्राफ यांनी शेतकऱ्यांसोबत दीर्घ विचारमंथन केले. या कृषी मेळाव्यात शास्त्रज्ञांनी पिकांच्या वैविधकरणावर भर दिला आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांच्या पिकांचे विपणन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी यूपीएसचे चेअरमन राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे पंजाबमध्ये कर्करुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, हा शेतकऱ्यांमध्ये पसरत चाललेला गैरसमज दूर केला.यंग फार्मर्स असोसिएशन (वायएफए) तर्फे रखडा गावात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मुंबईहून आलेले क्रॉप केअर फेडरेशनचे चेअरमन तथा यूपीएलचे चेअरमन राजू श्राफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन श्राफ यांचा सत्कार केला. याप्रसंगी फळे, फुले, भाज्यांची बियाणे, रोपटी आणि कृषी यंत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शिवाय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या संदर्भातील पुस्तकांचे प्रदर्शनही होते.डॉ. महापात्रा म्हणाले की, पंजाबात झिंग्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. झिंग्याची निर्यात करूनही उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते. पिकांच्या वैविधीकरणावर भर देताना महापात्रा यांनी वायएफएसोबत युवा वर्गाला नव्या तंत्रज्ञानासह शेतीशी जोडणे, प्रशिक्षण देणे, येथील माती व पाण्याचा विचार करून रखडा गावात पुढच्या वर्षी एक केंद्र स्थापन करणे आणि या केंद्राला सर्वप्रकारचे आर्थिक व तंत्रज्ञानविषयक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक म्हणून नव्हे तर आपले उत्पन्न वाढविण्यासाठी एक उद्योजक म्हणूनही पुढे आले पाहिजे, असे महापात्रा म्हणाले.राजू श्राफ यांनी कीटकनाशकांच्या वापरामुळे पंजाबमधील पाणी दूषित होत असल्याचा बिगर सरकारी संघटनांचा दावा खोडून काढला. केंद्र सरकारने विनाविलंब डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी मागणी डॉ. सतनाम सिंग यांनी केली. ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर आयोगाच्या शिफारशी लागू करणेच योग्य होईल.या शेतकरी मेळाव्यात डॉ. जे. पी. शर्मा, डॉ. डी. के. यादव, डॉ. जी. पी. सिंग आणि डॉ. प्रभू यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मत मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांशी आम्ही अवगत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायएफएचे सरचिटणीस भगवान दास यांनी केले.