नवी दिल्ली : नागरिकांना पोलिसांचा सन्मान करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केले आहे. दिल्लीपोलिसांच्या आयोजित 73 व्या रेजिंग डे परेडमध्ये अमित शाह बोलत होते. यावेळी पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत म्हणून आपण त्यांच्यावर फक्त टीका किंवा गुंडांसारखे त्यांना लक्ष्य करणे चांगले नाही. पोलिसांचे काम समजून घेतले पाहिजे, असे अमित शाह यांनी सांगितले.
शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस कोणताही धर्म किंवा जात पाहून करत नाहीत. आवश्यकतेनुसार पोलीस मदत करतात. पोलीस कोणाचेही शत्रू नाहीत, तर पोलीस शांतता आणि सुव्यवस्थेचे मित्र आहेत. त्यामुळे पोलिसांचा सतत सन्मान केला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
आपल्यासाठी अनेक उत्सव असतात. मात्र, पोलिसांसाठी प्रत्येक उत्सव हा त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी असते. अशा जबाबदाऱ्यासोबत ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्याप्रती देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आदर असला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
याशिवाय, दिल्ली पोलिसांनी अनेक स्मार्ट योजना राबविल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी निर्भया फंड अंतर्गत डायल 112 आणि नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना केली आहे. पंतप्रधान मोदींनी 35,000 जवान आणि पोलिसांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय पोलीस मेमोरियलची स्थापना केली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
याचबरोबर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर 35,000हून अधिक पोलीस कर्मचार्यांनी देशाचे रक्षण व देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्ली पोलिसांची सुरुवात केली ही अभिमानाची बाब आहे, असेही अमित शाह म्हणाले.
आणखी बातम्या
अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही - जे. पी. नड्डा
महायुतीच सरकार येईल असे वाटत असताना विश्वासघात झाला: चंद्रकांत पाटील
केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुन्याच मंत्र्यांनी घेतली शपथ
'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'
बाप रे! संपूर्ण दिल्ली देशद्रोही; सामनातून भाजपवर टीकास्त्र