काँग्रेसची टीका : लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यासाठी दबाव ठेवणार
नवी दिल्ली : काँग्रेसने भाजपाच्या या ना:यावर उपरोधिक टीका केली़ आमच्यासाठी एक तर एकच भारत आहे आणि उरली गोष्ट श्रेष्ठ भारताची तर अभिभाषणात याचा कुठलाही उल्लेख नाही, असे काँग्रेसने म्हटल़े राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील रालोआ सरकारच्या अजेंडय़ात पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारच्याच योजनांची नक्कल केली गेली, असा दावाही काँग्रेसने केला़ सभागृहात संख्येने कमी असली तरी काँग्रेस पक्ष सरकारवर लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यासाठी दबाव कायम ठेवील, असे लोकसभेचे काँग्रेस नेते मल्लिकाजरुन खर्गे म्हणाल़े राज्यसभेतील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी अभिभाषणात काहीही नवे नसल्याचा दावा केला़
लाल किल्ल्यावर भगवा
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकविण्याच्या बयानाचा लोकसभेत विरोधी सदस्यांनी जोरदार विरोध केला़ यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आल़े
एक दिवस लाल किल्ल्यावर भगवा फडकेल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडीच दशकांपूर्वी म्हटलेले हे वाक्य आज खरे झाले, असे वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना केल़े यावर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस आदींनी तीव्र आक्षेप नोंदवला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्भाजपाचा प्रचार व मार्केटिंग चांगली आह़े पण केवळ मार्केटिंगने काम चालत नाही, गुणवत्ताही असायला हवी़ विकासाच्या नावावर नवे सरकार देशाची दिशाभूल करीत असेल तर जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असे लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकाजरुन खारगे म्हणाले.
च्मोदी सरकारच्या अजेंडय़ातील बहुतांश योजना व कार्यक्रमांवर मनमोहनसिंग सरकारने याआधीच 9क् टक्के काम करून टाकले आह़े अभिभाषणातील रालोआ सरकारच्या अजेंडय़ात काहीही नवे नाही़, असे राज्यभेसेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
च्लोकसभेत काँग्रेसची संख्या 44 वर पोहोचली असली तरी देशातील 1क् कोटी 45 लाख लोकांनी आम्हाला मतदान केले आह़े, असे सांगत लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकाजरुन खारगे यांनी सत्ताधा:यांची टीका परतवून लावली़