नवी दिल्ली-
बायोलॉजिकल ई. लिमिटेड (BE) कंपनीच्या CORBEVAX लसीला आता आपत्कालीन परिस्थितीत कोरोना बुस्टर डोसच्या स्वरुपात वापरण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) सहमती दिली आहे. कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन्ही डोस घेतलेले १८ वर्ष आणि त्यावरील अधिक वयाचे नागरिक आता आपत्कालीन परिस्थितीत CORBEVAX लस बूस्टर डोस स्वरुपात घेऊ शकणार आहेत.
हैदराबाद स्थिती फार्मास्युटिकल आणि वॅक्सीन कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेड कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार CORBEVAX लसीला कोरोनाचा बुस्टर डोस म्हणून वापराला डीसीजीआयनं मंजुरी दिली आहे. बीई कंपनीची CORBEVAX लस भारतात निर्मिती करण्यात आलेली पहिली अशी लस ठरली आहे की ज्यास बूस्टर डोस स्वरुपात मंजुरी मिळाली आहे.
नुकत्याच कमी केल्या गेल्या किमतीबायोलॉजिकल ई. लिमिटेड कंपनीनं नुकतंच आपल्या कोरोना लस CORBEVAX च्या किमतीत घट केली होती. CORBEVAX खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर जीएसटीसह ८४० रुपयांऐवजी २५० रुपयांना मिळणार आहे. तर कंज्युमर्ससाठी याची किंमत प्रति डोस ४०० रुपये इतकी असणार आहे आणि यात टॅक्स तसंच अॅडमिनिस्ट्रेशन फी देखील समाविष्ट असणार आहे.
कुठं करू शकता लसीचं बुकिंगCORBEVAX लस घेण्यासाठी Co-WIN अॅप किंवा Co-WIN पोर्टलच्या माध्यमातून स्लॉट बुक करता येईल. आतापर्यंत देशभरात CORBEVAX लसीच्या ५१.७ लाख डोस देण्यात आले आहेत.