नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढते असून, ते आता ९६.९६ टक्के झाले आहे. शुक्रवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार होती तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के आहे.
शुक्रवारी कोरोनाचे १८,८८५ नवे रुग्ण आढळून आले, तर २०,७४६ जण बरे झाले. या दिवशी संसर्गाने १६३ जणांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या १,५४,०१० झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १,०७,२०,०४८ आहे. त्यातील १,०३,९४,३५२ जण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १,७१,६८६ झाली असून, त्यांचे प्रमाण १.६० टक्के आहे. आजवर २,९२,२८,०५३ जणांना कोरोना लस देण्यात आली. जगभरात १० कोटी २० लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ७ कोटी ३९ लाख रुग्ण बरे झाले आहेत.
ब्रिटनमध्ये ८ मार्चपर्यंत लॉकडाऊनब्रिटनमध्ये कोरोनाने माजविलेल्या हाहाकारामुळे ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहेत. या देशात ३७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ लाख जणांचा मृत्यू झाला तर १६ लाख लोक बरे झाले आहेत.