शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोरोनाने उडवला नोटांचाही रंग; सॅनिटायझर व इस्त्रीचा वापर केल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 6:59 AM

रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ७५० पटींनी वाढले आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे चलनी नोटांनाही मोठा फटका बसत असून, वारंवार सॅनिटाइझ केल्यामुळे, तसेच धुतल्यामुळे नोटांचा रंग उडत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ७५० पटींनी वाढले आहे. पाचशे आणि दोनशेच्या नोटांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेत छोट्या नोटांना कमी फटका बसला आहे. २०१८-१९ मध्ये दोन हजारांच्या ६ लाख नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या. २०२०-२१ मध्ये ही संख्या तब्बल ४५.४८ कोटींवर पोहोचली. हे प्रमाण तब्ब्ल ७५० पट अधिक आहे. २०१८-१९ मध्ये दोनशेच्या केवळ १ लाख नोटा खराब झाल्या होत्या. ही संख्या २०२०-२१ मध्ये ११.८६ कोटी झाली. हे प्रमाण तब्बल १,१८६ पट अधिक आहे. पाचशेच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण ४० पटींनी वाढले आहे. छोट्या मूल्यांच्या नोटांत हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी आहे. नोटा खराब होण्यास कोरोना साथ जबाबदार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीने लोक मोठ्या प्रमाणात नोटा सॅनिटाइझ करीत आहेत. ज्यांच्याकडे सॅनिटायझर नाही, ते लोक नोटा साबणाने धुऊन इस्त्री करीत आहेत.  त्यामुळे नोटा खराब होत आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.नोटा नष्ट करण्यासंबंधीची आकडेवारी (संख्या लाखात)    नोट         २०१८-१९         २०१९-२०        २०२०-२१    २,०००           ०६               १,७६८             ४,५४८    ५००           १५४              १,६४५             ५,९०९    १००          ३७,९४५          ४४,७९३          ४२,४३३    ५०            ८,३५२           १९,०७०            १२,७३८    २०            ११,६२६          २१,९४८           १०,३२५    १०            ६५,२३९         ५५,७४४          २१,९९९    ५              ५९१                १,२४४            ४६४    २००             ०१               ३१८             १,१८६(आकडे रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक