Corona Cases in India: कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. देशात अशी 12 राज्ये आहेत जिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही शहरांचाही समावेश आहे. सध्या भारतात संसर्गाचे प्रमाण 0.84 टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 16 हजार 522 वर गेली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आकडेवारीनुसार, 18 ते 24 एप्रिल दरम्यान 15,700 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर त्या आधीच्या आठवड्यात 8050 रुग्ण आढळले होते. ही 95 टक्क्यांची वाढ चिंतेचा विषय बनली आहे. हा दुसरा आठवडा आहे जेव्हा कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी 11 आठवड्यांपर्यंत कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली होती. कोरोना प्रकरणांमध्ये या वाढीचे कारण ओमायक्रॉन सब-व्हेरियंट आहे की आणखी काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांगली बाब म्हणजे, मृतांच्या संख्येत वाढ झालेली नाही.
12 राज्यांमध्ये रुग्णवाढआतापर्यंत फक्त दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या वाढत होती. पण, गेल्या आठवड्यात इतर 9 राज्यांमध्ये चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 48 टक्के, कर्नाटकात 71 टक्के, तामिळनाडूमध्ये 62 टक्के, बंगालमध्ये 66 टक्के, तेलंगणामध्ये 24 टक्के आणि राजस्थानमध्ये 57 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.