शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:46 AM

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला.

नवी दिल्ली : नीट (यूजी) व जेईई (मेन) या प्रवेश परीक्षा वेळेवरच होणार, असे केंद्राने बुधवारी पुन्हा स्पष्ट केले असले तरी कोरोनाच्या उद्रेकामुळे या काळात या परीक्षा घेण्यास १० राज्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्य सरकारांसोबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले.

कोरोनाचा उद्रेक, वाहतूक बंद, विद्यार्थी गावांमध्ये अडकलेले, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी आदी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलाव्यात, असा विरोधकांचा सूर आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ, पुडुच्चेरी, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांचा परीक्षा आता घेण्यास विरोध असून, तमिळनाडूने आपल्यापुरती सूट मागितली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला. परीक्षा पुढे ढकलाव्यात, यासाठी मी पंतप्रधानांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली. मात्र उपयोग झाला नाही, असे त्या म्हणाल्या. परीक्षा रद्द करण्याची मागणी महाराष्टÑाने प्रथमपासूनच केली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करावा, असे सरकारने म्हटले आहे. परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या निवडीची पर्यायी व्यवस्था केंद्राने करावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलणारकोरोनाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.४ लाख प्रवेशपत्रे डाऊनलोडएनटीएने परीक्षार्थींसाठी प्रवेशपत्रे आॅनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. पहिल्या तीन तासांत तब्बल ४ लाख परीक्षार्थींनी प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेतली आहेत. नीटसाठी १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जेईईसाठी ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.नीट, जेईई ठरल्यावेळीच जेईई (मेन) १ ते ६ सप्टेंबर आणि नीट (यूजी) १३ सप्टेंबर रोजी ठरल्यावेळीच होणार आहेत, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले. परीक्षा घेताना काटेकोर काळजी घेतली जाईल. केंद्रांची संख्या वाढवणे, एकाआड एक उमेदवाराची बैठक व्यवस्था, प्रत्येक खोलीत कमी उमेदवार अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे एनटीएने सांगितले. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही परीक्षा ठरल्यावेळीच होणार, असे बुधवारी स्पष्ट केले.

टॅग्स :examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या