शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
4
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
5
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
6
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
7
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
8
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
9
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
10
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
11
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
12
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
13
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
14
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
15
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
16
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
17
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
18
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
19
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
20
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम

सावध व्हा! एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट, तिसऱ्या लाटेनंतर सर्वात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 8:48 AM

गेल्या आठवड्यात (26 मार्च ते 1 एप्रिल) देशात 18,450 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. जानेवारी 2022 मधील तिसऱ्या लाटेनंतर गेल्या सात दिवसांत कोरोना संक्रमणाची संख्या सर्वात वेगवान दराने वाढल्याने भारतात शनिवारी 3,800 हून अधिक नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली. 6 महिन्यांतील दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे.

गेल्या आठवड्यात (26 मार्च ते 1 एप्रिल) देशात 18,450 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. जी मागील आठवड्यात नोंदवलेल्या 8,781 प्रकरणांपेक्षा 2.1 पट जास्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आता कोरोना प्रकरणे दुप्पट होण्याची वेळ सात दिवसांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या वेळी एका आठवड्यात दररोजची संख्या दुप्पट झाली, ती तिसऱ्या लाटेदरम्यान होती. तसेच, चांगली म्हणजे, दैनंदिन प्रकरणे तुलनेने कमी राहिली आहेत आणि मृत्यूची वाढ देखील किरकोळ आहे. गेल्या सात दिवसांत 29 वरून 36 मृत्यूची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. केरळ, गोवा आणि दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. यापैकी बहुतेक राज्यांमध्ये मागील आठवड्यातील प्रकरणे त्याआधीच्या आठवड्यापेक्षा तिप्पट आहेत. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचे 1200 नवे रुग्ण आढळले आहेत, तर त्याआधी आठवड्यात 409 रुग्ण आढळले होते. केरळमध्ये गेल्या आठवड्यात 4000 प्रकरणे समोर आली आहेत, तर याठिकाणी मागील आठवड्यात 1333 नवीन प्रकरणे समोर आली. येथे संसर्गाचे प्रमाण तिप्पट आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवीन प्रकरणांची संख्या तुलनेने जास्त आहे. या राज्यांमध्ये काही आठवड्यांपासून व्हायरस पसरत आहे. महाराष्ट्रात स्थिरता असताना, गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांचा वेग कमी झाला. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर तेलंगणात घट आणि आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची वाढ होताना दिसून येत आहे. याचबरोबर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 3323 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर त्याआधीच्या आठवड्यात नवीन प्रकरणांची संख्या 1956 होती. 

गुजरातमध्ये 2,412 नवीन प्रकरणांसह गुजरात पहिल्या तीन राज्यांमध्ये राहिले. परंतु प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा दर मागील आठवड्यात 139 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये प्रकरणांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे, तर देशाची राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात 1,733 नवीन संसर्गाची नोंद झाली आहे, जी मागील कालावधीतील 681 च्या संख्येपेक्षा 2.5 पट जास्त आहे. पंजाबमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 3.3 पट वाढ झाली आहे. हरयाणामध्ये 3 पट आणि उत्तर प्रदेश 2.5 पट वाढ झाली आहे. देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांचा हा सलग सातवा आठवडा होता आणि गेल्या आठवड्यात सर्व प्रमुख पॅरामीटर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस