शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 8:30 AM

साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर, मात्र दुष्परिणामांचा तडाखा कायम, मेंदूच्या विकासाचा वेग वाढल्याने तरूणाईला अकाली वृद्धत्वाचा विळखा

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना आजार भारतासहित जगातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असतानाच त्या साथीने झालेल्या दुष्परिणामांतून लोकांची अद्याप सुटका झालेली नाही. कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक किशोरवयीन मुले, युवकांच्या मेंदूचे वय वाढले असून त्यांना अकाली वृद्धत्व आले आहे. या बदलाचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असे एका संशोधनातून आढळून आले. साथीच्या काळात अनेक प्रश्नांचे गुंते सोडविताना वाढलेल्या ताणतणावांचा किशोरवयीन मुले, युवकांच्या मनावर परिणाम झाला. ते आपल्या तारुण्यसुलभ भावना व चैतन्य हरवून बसले. या मुलांनी प्रौढ व्यक्तींप्रमाणे विचार करायला व वागायला सुरूवात केली. यासंदर्भात केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. जगभरातून कोरोनाची रुग्णसंख्या उतरणीला लागलेली असताना हे नवे आजार लोकांपुढे अनेक समस्या निर्माण करीत आहेत. 

देशात सर्वात कमी रुग्णांची नोंद

देशात एप्रिल २०२० नंतर शुक्रवारी कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजे २७५ नवे रुग्ण आढळून आले. ६ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचे ४८९ रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या घटलेल्या रुग्णसंख्येवरून तो आजार देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. 

सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४,६७२ वर आली आहे. कोरोनामुळे केरळ आणि छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मृतांची संख्या ५,३०,६२४ झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८०%भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८० टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४१,३७,६१७ वर पोहोचली आहे, तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत देशात आतापर्यंत लसींचे २१९.९३ कोटी डोस देण्यात आले आहेत.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधन...२०२० साली प्रौढ व्यक्तींना जाणवणाऱ्या तणावामध्ये त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत २५% वाढ झाली. कोरोनाने मानसिक ताणतणाव व आजारांत वाढ झाली.

अतिविचार, तणाव ठरले घातकसंशोधक इयान गोटलिब यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या आधी व साथीच्या काळात १६३ विद्यार्थ्यांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला होता. साथीतील ताणामुळे व अतिविचारामुळे मेंदूचा विकास होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ लागल्याचे या पाहणीतून निदर्शनास आले होते. तरुणवयात ही मुले अकाली वृद्ध झाल्याची चिन्हे आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल