शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राजधानीत कोरोनाचा हाहाकार, देशातील प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत, अशी आहे देशाची स्थिती

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 22, 2020 6:34 PM

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देगेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोनामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सर्वाधिक पहायला मिळत आहे. येथे देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू नोंदवले जात आहेत. एवढेच नाही, तर काही फॅक्ट्स आणि नवा रिपोर्ट भविष्यातील भयावह परिस्थितीचा सायरण वाजवत आहे. गेल्या 6 दिवसांत येथे सरासरी 100 लोकांचा मृत्यू होत आहे. 

सध्या दिल्लीत मृतांच्या आकड्यावरून सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील 20 टक्के मृत्यू एकट्या दिल्लीत होत आहेत. 21 नोव्हेंबरला दिल्लीत तब्बल 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर देशभरात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रमाणे विचार केल्यास, कोरोनामुळे देशात प्रत्येक पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. तर प्रत्येक 10वा रुग्ण दिल्लीतून आहे. आतापर्यंत दिल्लीत 8 हजार 270 जणांचा कोरोनाने बळी घेतला. गेल्या 24 तासांत येथे 45 हजारहून अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी 5879 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्थात प्रत्येक 100 पैकी 13 लोक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सध्या दिल्लीत करोनाचे 39 हजार 741 रुग्ण सक्रिय आहेत. 

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा - 21 नोव्हेंबर-111 20 नोव्हेंबर- 11819 नोव्हेंबर- 9818 नोव्हेंबर-131 17 नोव्हेंबर- 9916 नोव्हेंबर-99

आयएलबीएस डायरेक्टर डॉक्टर एसके सरीन म्हणाले, मास्कवर 2000 रुपयांचा दंड म्हणजे काही दंड नाही. ही सायंस समजावण्याची पद्धत आहे, जे लोकांनी ऐकले नाही. प्रॉपर मास्क लावणे अत्यंत आवश्यक आहे. खोकलल्याने, शिंकल्याने आणि मोठ्याने हसल्याने व्हायरस पसरतो. म्हणून मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. 

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

कशी आहे देशाची स्थिती -देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 45209 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 9095806वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 133227 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर