नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून वेगाने पसरलेल्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आले आहे. मात्र कंट्रोल रुमला फोन करून काही जण त्रास देत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. एकाने घरातून फोन करून चार समोसा भिजवा दो असं सांगत मस्करी केली होती. त्यानंतर आता दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी माजी मंत्र्यांना मेसेज केल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील भिवडीमध्ये दारू प्यायल्यानंतर दोन व्यक्तींनी थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज केल्याची घटना घडली आहे. नशेत असलेल्या दोघांनी मंत्र्यांना मेसेज करून त्यांच्याकडे रेशनची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रेशन मागणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी दारू प्यायल्यानंतर माजी मंत्री उपेंद्र कुशवाहा यांना मेसेज केला आणि खाण्यासाठी पिण्यासाठी आपल्याकडे काही नाही असं सांगितलं.
उपेंद्र कुशवाहा यांनी असा मेसेज आल्यावर ती माहिती राज्य सरकारला पाठविली. त्यानंतर राज्य सरकारने पोलिसांना रेशन घेऊन तरुणांकडे पाठविले. त्यावेळी ते दोघेही बसून आरामात दारू पित असल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये कंट्रोल रुमला एकाने घरातून फोन करून चार समोसा भिजवा दो असं सांगत मस्करी केली. मात्र त्याची ही मस्करी त्याच्या अंगलट आली.
पोलिसांनी फोन करण्याला चांगलीच अद्दल घडवली असून नाला साफ करण्याचं काम दिलं होतं. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दरम्यान एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन केला आणि चार समोसा भिजवा दो असा थेट पोलिसांनाच आदेश दिला. पोलिसांनी हा फोन करणाऱ्याचा शोध घेतला आणि रात्रीच त्याला शोधून काढलं. त्याला नाला साफ करण्याचं काम दिलं आणि त्याच्याकडून नाला साफ करून घेतला. रामपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल
coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या
Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी
Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'