भारतासह देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा पसरू लागला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या इतर भागातही कोरोनाची प्रकरणे आता वैद्यकीय तज्ज्ञांचे टेन्शन वाढवत आहेत. जर आपण जागतिक स्तरावर कोरोनाबद्दल बोललो, तर गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाचे 66 हजार रुग्ण आढळले आहेत. रविवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे 72 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह पॉझिटिव्हिटी रेट 3.95 टक्के झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे H3N2 व्हायरससोबतच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह दर शनिवारी 3.52 टक्के होता. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमुळे तणाव वाढत आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे 236 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या 236 पैकी 52 प्रकरणे मुंबईत आली आहेत. याशिवाय ठाण्यात 33, पुण्यात 69, नाशिकमध्ये 21 आणि कोल्हापूर आणि अकोल्यात प्रत्येकी 13 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी राज्यात कोरोना व्हायरसचे 236 नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यानंतर राज्यातील संसर्गाच्या रुग्णांची संख्या 81,39,737 झाली आहे. यादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले नाही.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 918 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, सोमवारी सक्रिय रुग्णांची संख्या 6350 वर गेली आहे. त्याच वेळी, सकारात्मकता दर 2.08% वर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 92.03 कोटी लोकांची कोविडची चाचणी करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 44,225 चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत 479 लोक बरे झाले आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसांत 1000 हून अधिक रुग्ण आढळले. देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 5,915 वर पोहोचले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृतांची संख्या 5,30,802 झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक आणि केरळमधील एक रुग्ण आहे.
वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणतात?
भारतात सुमारे चार महिन्यांनंतर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोविड-19 XBB प्रकाराचा वंशज XBB 1.16, गेल्या काही दिवसांत भारतात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढीमागे असू शकतो. भारताव्यतिरिक्त, हा प्रकार चीन, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स आणि इतरांसह विविध देशांमध्ये देखील वेगाने पसरला आहे. एका अहवालानुसार, कोविड-19 च्या या प्रकारामुळे नवीन लाट येण्याची शक्यता वाढू शकते. कोरोना प्रकारांवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठानुसार, भारतात सध्या कोरोनाच्या XBB 1.16 प्रकारातील सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"