नवी दिल्ली - भारतात कोविड १९(Covid-19) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या ४ महिन्यानंतर गुरुवारी कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण नोंदवले गेले. सध्या भारतात एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ४,६२३ इतकी आहे. मागील काही दिवसांत देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णवाढीसाठी कोविड १९ चा XBB हा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
अनेक देशात मिळणारा कोरोनाचा XBB.1.16 हा व्हेरिएंट आता भारतात आल्याचं दिसून येते. भारताशिवाय चीन, सिंगापूर, संयुक्त राज्य अमेरिका आणि अन्य वेगवेगळ्या देशात हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. TOI नुसार, कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारतात नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात आता कोरोना XBB 1.16 व्हेरिएंटचे रुग्णांची संख्या जास्त आहे. रिपोर्टनुसार, भारतात ४८, सिंगापूर, अमेरिकेत प्रत्येकी १४-१५ रुग्ण सापडले आहेत.
भारतात वेगाने वाढतोय XBB.1.16 व्हेरिएंटCovSpectrum नुसार, XBB 1.16 व्हेरिएंट XBB.1.15 मधून आलेला नसून XBB.1.16 आणि XBB 1.15 दोन्ही कोरोनाच्या XBB व्हेरिएंटपासून बनले आहेत. XBB व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला असून देशातील काही राज्यात त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
WHO नुसार, व्हॅक्सिन सेफ्टी नेटचे सदस्य डॉ. विपीन एम वशिष्ठ जे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर नजर ठेवून आहेत. XBB 1 व्हेरिएंटचं पुढील रुप XBB 1.5 जगभरात प्रभावी झाले परंतु भारतात नाही. जागतिक स्तरावर XBB.1.16 व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे लोकांच्या इम्युनिटीवर परिणाम होत आहे.
XBB 1.16 ची लक्षणे काय?आतापर्यंतच्या नव्या सर्कुलेटिंगमध्ये कोविड XBB 1.16 शी संबंधित कुठलीही वेगळी लक्षणे सांगण्यात आली नाहीत. कोविडची जुनी लक्षणे जी संक्रमित होतात त्यात डोकेदुखी, अंगदुखी, गळ्यात घवघवणे, सर्दी, खोकला इ. लक्षणे असू शकतात. त्याशिवाय काहींना पोटदुखी, थकवा आणि श्वास घेण्यास अडचणही होऊ शकते.