शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 10:42 PM

Uttarakhand glacier burst : जेव्हा उत्तर भारतातून  हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला होता. 

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये आज जी घटना घडली त्याला वैज्ञानिकांनी कोरोनाला जबाबदार धरले आहे. एकीकडे उत्तराखंडच्याच संशोधकांनी आठ महिन्यांपूर्वी इशारा दिल्याचा दावा केलेला असताना आता नवीन कोरोना दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. (due to corona lockdown Pollution decresed ans sun rays directly on Glaciar.)

वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. यामुळे जलवायूमध्ये परिवर्तन झाले आणि वरचे वातावरण एवढे साफ झाले की हिमकड्यावर साठलेला बर्फ हळू हळू वितळू लागला. यामुळे हिमकड्याला तडे गेले आणि हिमनदीचे साचलेले पाणी कोसळले. भविष्यात देखील असे प्रकार वाढण्याचा धोका या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. 

भारतीय हवामान विज्ञान सोसायटीचे उत्तर भारताचे अध्यक्ष आणि वरिष्ठ हवामान तज्ज्ञ  डॉ. एसपी भारद्वाज यांनी हा दावा केला आहे. हा हिमकडा कोसळण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतू प्रथमदृषट्या असे दिसतेय की सूर्याची किरणे थेट बर्फावर पडली आणि बर्फ वेगाने वितळला. यामुळे वरती जमलेला बर्फ कोसळला. यामुळे धौलगंगा  नदीमध्ये वेगाने पाणी कोसळले. सध्या हिमालयामध्ये प्रदूषणाचे कण काहीच नाहीएत. यामुळे आधीपेक्षाही अधिक तीव्रतेची किरणे पडू लागली आहेत. 

डॉक्टर एसपी पाल यांनी सांगितले की, कोरोनामुळे जगभरात लॉक़डाऊन झाले. यामुळे प्रदूषण कमी झाले. जेव्हा उत्तर भारतातून  हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला होता. 

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. या दुर्घटनेत 176 हून अधिक कामगार बेपत्ता असून आतापर्यंत 16 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर 7 जणांचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंडच्याच वैज्ञानिकांनी तब्बल 8 महिन्यांपूर्वी इशारा दिला होता. उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागांत असे बर्फ आहेत जे कधीही तुटू शकतात. यासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या काराकोरममधील श्योक नदीचे उदाहरण दिले होते. सध्या 22-23 जून 2020 आणि 29 मे 2020 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे असेच मोठे बर्फ बंधारे बनले आहेत. ते कधीही फूटू शकतात असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. मात्र, त्यांच्य़ाकडे यावर काही उपाय नाहीय.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाcorona virusकोरोना वायरस बातम्या