शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

Coronvirus: कोरोनाचा उद्रेक: देशात दिवसभरात तब्बल २१ हजार जणांना बाधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 3:45 AM

१७ हजार नवे रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांत

नवी दिल्ली : देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

या २४ तासांत महाराष्ट्रात ६३२८, तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. या सर्व राज्यांमध्ये बाधितांची संख्या १५ हजार वा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या १८ हजार २१३ झाली असून, त्यात गेल्या २४ तासांतील ३७९ जणांचा समावेश आहे. मात्र देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून ६०.७३ टक्के झाले आहे. संख्येत सांगायचे, तर आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या २ लाख २७ हजार ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये वाढले आणि १ जून ते २ जुलै या काळात ४ लाख ३५ हजार जणांना संसर्ग झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले.

मृतांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८१७८ असून, त्याखालोखात दिल्ली (२८६४), गुजरात (१८८६), तामिळनाडू (१३३२), उत्तर प्रदेश (७३५) पश्चिम बंगाल (६९९), मध्य प्रदेश (५८९), राजस्थान (४३०) व तेलंगणा (२७५), कर्नाटक (२७२) या राज्यांचा क्रमांक लागतो. हरयाणा, आंध, पंजाब आणि जम्मू व काश्मीर या चार राज्यांत मृतांची संख्या प्रत्येकी २०० हून कमी आहे.देशभरातील नमुन्यांची तपासणी वेगानेदेशात नमुन्याची तपासणीही वेगाने सुरू असून, गुरुवारी २ लाख ४१ हजार ५६१ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत देशात ९२ लाख ९७ हजार ७४९ चाचण्या पार पडल्या, अशी माहिती आयसीएमआरतर्फे देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या