देशातील कोरोनाबाधितांची संख्य़ा भयावह स्थितीत असून दिवसाला 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापेक्षा अधिक भीतीदायक मृत्यूंची संख्या आहे. एकूण कोरोना बळींची संख्या 50000 होण्यासाठी केवळ 20 मृत्यू कमी आहेत.
देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 63,489 नव्या रुग्णांची भर पडली. तर 944 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडणारा हा सलग नववा दिवस आहे. संक्रमितांचा एकूण आकडा 25 लाख 89 हजारवर गेला आहे. दिलासादायक म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 18 लाखांवर गेला आहे. तसेच कोरोना चाचण्यांमध्येही वाढ झाली आहे.
रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासांत झालेल्या मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा 49,980 झाला आहे. एकूण कोरोनाबाधितांपैकी 6,77,444 लोकांवर उपचार सुरु आहेत. 18,62,258 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामध्ये काही परदेशी नागरिकही आहेत.
आयसीएमआरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 15 ऑगस्टपर्यंत एकूण 2,93,09,703 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी एकाच दिवसात 7,46,608 चाचण्या करण्यात आल्या.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही
चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज
SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटचा दिवस
EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड
Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत