नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने सात लाखांचा टप्पा पार केला आहे. पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका 37 वर्षीय कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. याबाबत आता एक धक्कादायक माहिती आता समोर आली असून आरोग्य मंत्रालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तरुण सिसोदिया असं पत्रकाराचं नाव असून काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण सिसोदिया यांनी रुग्णालयात दाखल असताना तेथील उपचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच आरोग्य मंत्रालयाकडेही यासंबंधी तक्रार केली होती.
तरुण यांच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावरील त्यांचं एक चॅट जोरदार व्हायरल होत आहे. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चॅट मेसेज व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुण सिसोदिया यांनी आपली हत्या होईल अशी भीती व्यक्त केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून जर कोणी यामध्ये दोषी आढळलं तर कठोर कारवाई केली जाईल असं देखील हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. देशात देखील कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल
CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता
कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग
India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत