बरेली - देशात कोरोनाहा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्य संख्येत दिवसागणिक वाढ होत असून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 35 लाखांच्या वर गेला आहे. तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर एका नेत्याने रुग्णालयातून पळ काढला आणि पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रमन जौहरी असं समाजवादी पार्टीच्या नेत्याचं नाव असून त्याने आत्महत्या केली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर भोजीपुरातील एसआरएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रमन यांनी रुग्णालयातून पळ काढला आणि पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रमन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातून पळ काढला. बरेली-नैनीताल हायवेवर असलेल्या पुलावरुन उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र रमन यांचा यामध्ये मृत्यू झाला होता. समाजवादी पार्टीच्या लोकांनी रमन जौहरीच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डायल 112 च्या टीमला भोजीपुरा स्टेशनच्या पूर्व दक्षिण केबिनच्या समोर रमन गंभीर अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. रमन यांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांना जबरदस्त धक्का बसला. एसआरएस रुग्णालयातून पोलीस ठाण्यात एक कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळाला असल्याची माहिती देण्यात आली होती. कुटुंबीयांनी रमन जौहरी हरवण्याची तक्रार नोंदविली होती. कोरोनाग्रस्त रमन रुग्णालयाच्या खिडकीची काच तोडून बाहेर पडले होते. त्यानंतर पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...
"... मात्र पंतप्रधानांनी केली 'खेळण्यांवर चर्चा'", राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
"चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?"
बापरे! 17 वर्षांपासून तरुणाच्या डोक्यात होता 5 इंचाचा किडा, डॉक्टरांनाही बसला धक्का
काय सांगता? तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरीला गेलेलं मंगळसूत्र