थिरूवनंतपूरम : देशात गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ४६,१६४ रुग्णांची नोंद झाली तर ६०७ जणांचा मृत्यू झाला. देशात रोज २० हजार रुग्णांची वाढ होत असून त्याचे कारण काही राज्यांत विशेषत: केरळमध्ये कोविड-१९ ने घेतलेली उसळी हे आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्ण संख्या होती. रुग्णसंख्येचासर्वाधिक फटका एर्नाकुलम (४,०४८ रुग्ण) आणि थ्रिसूर (३,८६५ रुग्ण) जिल्ह्याला बसला.
सणासुदीत काळजी घ्या : केंद्राचे आवाहन “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल, राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.सणासुदीच्या दिवसांत राज्यांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे कठोरपालन करून घ्यावे, असे राज्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.केरळमध्ये सिरोचा प्रभाव फारच कमी झाल्यापासून आम्हाला लवकरात लवकर बाधित झालेले शोधून त्यांना विलगीकरणात ठेवायचे आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या.
ओणमनंतर वाढकेरळमध्ये चाचण्या सकारात्मक निघण्याचा दर १९.०३ टक्के असून तो गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. या वाढीला कारण ठरला तो गेल्या आठवड्यात साजरा झालेला ओणम सण. ओणमनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी राज्याची अपेक्षा आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढवण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे.