शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

धक्कादायक ! कोरोना चाचणी महिलेची, अहवाल दिला पुरुषाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 7:37 AM

दादरमधील प्रकार, ईसीजीमध्ये केली खाडाखोड

मनीषा म्हात्रे मुंबई : वृद्ध आईची रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने तिला दादरच्या बड्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने बोलावलेल्या तरुणाकड़ून कोरोना चाचणी झाली. अहवाल निगेटिव्ह येताच, ईसीजीसह अन्य चाचण्या झाल्या. तेथून अन्य रुग्णालयात हलवले. लाखोंचा खर्चही झाला. मात्र, उपचारानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये, आईच्या नावाने दिलेला कोरोना चाचणी अहवाल बदलापूरमधील पुरुषाचा असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी दादर पोलिसांनी लॅब टेक्निशियन मोहम्मद तमीजउद्दीन जलालउद्दीन (२४), डॉ. ब्रिजेश गुप्ता, बादशहा, सफा नावाच्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला. 

प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या विनायक बाले (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ सप्टेबर रोजी ६३ वर्षीय भाग्या यांच्या  मानेत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना दादरच्या लाईफकेअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील कर्मचाऱ्यांनी बोलावलेल्या बादशाह नावाची व्यक्ती सॅम्पल घेऊन गेली. थायरोकेअर लॅबच्या नावाने पावतीही मिळाली.  अहवाल निगेटिव्ह येताच, पुढे ईसीजी काढण्यात आले. तेथून डॉ. ब्रिजेश गुप्ता यांनी सिम्बोयसिस रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे डॉ. अंकित देढीया यांनी तिची ॲन्जिओग्राफी व त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी केली. तेथे १८ सप्टेबरपर्यंत उपचार झाले. 

२२ तारखेला आईला जास्त त्रास झाल्याने तिला पुन्हा लाईफकेअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. गुप्ता यांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्यास सांगितले.  २४ तारखेला आईला डिस्जार्ज दिला. यादरम्यान तिच्यावर काय उपचार केले याबाबतची फाईल हाॅस्पिटलकडून मिळताच संशय आला. ईसीजी अहवालात हाॅस्पिटलच्या नोंदीनुसार, १३ सप्टेबर रोजी दाखल केले असताना ईसीजी प्रिंटिंगमध्ये ६ सप्टेंबरची तारीख दिसून आली. त्यात १४ आणि १५  तारखेच्या ईसीजीमध्येही तशीच चूक दिसून आली. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या अहवालाबाबत थायरोकेअरकडे चौकशी केली.  आईच्या नावाने दिलेला अहवाल हा सय्यद अलीचा असल्याचे समजले. तसेच रिपोर्टमध्ये कलेक्शनचे ठिकाण बदलापूर असल्याचे होते. वास्तविक स्वॅब कलेक्शन दादर येथील लाईफकेअर या हाॅस्पिटलमधून घेतले होते. त्यामुळे त्यांना धक्का बसला.  

कारवाई करू  नका, पैसे घ्या...विनायक यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व पावती आणि लेखी तक्रार दिली. त्यानंतर संबंधित तरुणाने कॉल करून २६ सष्टेंबर रोजी त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवले. त्यांनी ते पैसे पुन्हा पाठवले. त्याचा स्क्रीनशॉटही त्यांनी पोलिसांना दिला आहे.

दीड वर्षांपूर्वीच कामावरून काढलेn कोरोना चाचणीचे अहवाल घेऊन जाणाऱ्या तरुणाला दीड वर्षापूर्वीच कामावरून काढल्याचे थायरोकेअरकडून समजले. n मात्र तरुणाने ही बाब लपवली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याला नेहमीप्रमाणे कॉल करून बोलावून घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

कोरोना चाचणी अहवाल बनावट असल्याचे समजताच रुग्णालय प्रशासनाकडूनही संबंधित तरुणाविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. शिवाय योग्य उपचार करून संबंधित रुग्ण, कार्डियक समस्या असल्याने ईसीजी रिपोर्ट करून पुढील रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. त्यांना उपचार योग्य मिळाला की नाही याबाबत जे. जे रुग्णालयातील आरोग्य समितीने योग्य चौकशी केल्यास सर्व गोष्टी उघडकीस येतील. - डॉ. योगेश बाफना, प्रशासकीय प्रमुख, लाईफकेअर रुग्णालय, दादर

याप्रकरणी कोरोना चाचणीचे नमुने घेणाऱ्या तरुणासह चौघांंविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाईफकेअर हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टर तसेच थायरोकेअर लॅबच्या कर्मचाऱ्याचे जबाब नोंदवत तपास सुरू आहे. याप्रकरणी जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.- महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर पोलीस ठाणे

लाइफकेअरमध्ये आई दाखल असताना डॉ. ब्रिजेश गुप्ता यांनी खोटे ईसीजी बनवून त्यावर खाडाखोड करून थायरोकेअर लॅबच्या नावाने बनावट व्यक्तीकड़ून आईचा कोविड रिपोर्ट तसेच बनावट पावती देऊन लाईफकेअर हाॅस्पिटल तसेच सिम्बाँयसीस हाॅस्पिटलमध्ये उपचार घेण्यास भाग पाडले. तीन महिने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल केला. यात रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न होत असून यात मोठे     रॅकेट आहे. -  विनायक बाले, तक्रारदार, प्रभादेवी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस