शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भारतात तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू; फेब्रुवारीत गाठणार कळस, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 9:19 AM

सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या मध्यावस्था सुरू आहे. संसर्गाच्या प्रसाराचा वेग वाढत राहिला तर तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक यांनी व्यक्त केली आहे. 

ते म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे. ओमायक्राॅन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक आहे.  हा नवा विषाणू फुप्फुसांवर नव्हे तर श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करतो. त्याची लक्षणे सौम्य असली तरी आपण योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. ओमायक्रॉनमध्ये देखील भविष्यात आणखी परिवर्तन होणार आहे. कोणतीही साथ ही तीन ते चार लाटांनंतर संपुष्टात येते, असा आजवरचा इतिहास आहे. 

डॉ. रवि मलिक म्हणाले की, कोरोना संसर्गाविषयी साऱ्या जगालाच नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. कोरोना विषाणूचे आणखी काही नवे प्रकारही संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे ही साथ कधी संपुष्टात येईल याबद्दल आताच काही सांगणे योग्य नाही. 

लडाखमध्ये आणखी ५९ जण बाधित

देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून लडाखमध्ये गेल्या २४ तासांत ५९ नवे रुग्ण सापडले. तेथील एकूण रुग्णसंख्या २२ हजार झाली आहे. पुडुचेरीमध्ये आणखी ४४४ कोरोनाबाधित सापडले असून, रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांवर पोहोचला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये संसर्गदर ९.४ टक्के झाला आहे. 

अमृतसरमधील चाचण्यांची होणार चौकशी

इटलीवरून विमानाने अमृतसर येथे आलेल्यांपैकी काही जणांनी आम्ही कोरोनाबाधित नसून, चाचणी अहवाल चुकीचे आहेत असा आरोप केला. त्याची दखल घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) दिले आहेत. एका खासगी प्रयोगशाळेकडून या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत