पुणे: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलादादायक बातमी आहे. लहान मुलांना देण्यात येणारी मीजल्स लस (गोवर लस) कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यात प्रभावी ठरत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयानं याबद्दलचं संशोधन केलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट लस, रोगप्रतिकारशक्तीलाही देऊ शकतो चकवा? तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा
कोरोनाच्या संक्रमणापासून सुरुवातीला लहान मुलांचं संरक्षण करण्याचं काम करण्यात मीजल्स लस सक्षम असल्याचं संशोधन सांगतं. या सर्वेक्षणात १ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५४८ जणांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांचे दोन गट करण्यात आले होते. कोरोनाची लागण झालेले आणि कोरोनाची बाधा न झालेले अशा दोन गटांत मुलांची विभागणी करण्यात आली होती. मीजल्स लस SARS-Co-V-2 विरोधात ८७ टक्के प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलं. जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस
वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मीजल्स आणि बीसीजी लस घेतली असल्यानं लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते. मीजल्स लस गेल्या ३६ वर्षांपासून भारताच्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे.
लहान मुलांना मीजल्स लस दिल्यास कोरोनापासून त्यांचं संरक्षण होतं, याबद्दलचं संशोधन ह्यूमन वॅक्सिन अँड इम्युनोथेरेपेटिक नावाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकतंच प्रसिद्ध झालं. संशोधनातून समोर आलेली माहिती दिलासादायक आहे. मात्र अंतिम निष्कर्षांची प्रतीक्षा करायला हवी, असं तज्ज्ञांचं मत आहे.