नवी दिल्ली : देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. (corona third wave is not dangerous for children member of the policy commission dr v k paul claims)
तज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
(Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं")
दरम्यान, अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, काल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.
(Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली)
ब्लॅक फंगसवरील औषधाचे उत्पादन वाढविणारदेशात कोरोना महामारीनंतर आता आणखी एका आजाराने हाहाकार माजला आहे. या आजाराला बर्याच राज्यांत महामारी घोषित केली आहे. ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस असे या आजाराचे नाव आहे. या आजारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. ब्लॅक फंगसवर परिणामकारक औषध एम्फोटेरिसीन-बीच्या (Amphotericin B) मुबलक पुरवठ्यासाठी पाच कंपन्यांना उत्पादनासाठी परवानगी दिली आहे.