भोपाळ -मध्य प्रदेशातील मोरेना येथे 16 वर्षांच्या एका मुलाला कोरोना लस टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. लस टोचली गेल्यानंतर मुलाची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ही घटना मोरेना जिल्ह्यातील अंबा तहसीलच्या बाग भागात घडली. येथे कमलेश कुशवाहचा मुलगा पुल्लू, याला ही लस टोचण्यात आली. मोरेना जिल्हा मुख्यालयापासून 35 किमी अंतरावर असलेल्या एका केंद्रावर ही लस देण्यात आली. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, लस टोचल्यानंतर पिल्लूला गरगरायला लागले आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. यानंतर त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठविण्यात आले.
बापरे! एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण; 'या' देशात खळबळ
पिल्लूची प्रकृती खालावल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ केला होता. मोरेनाचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CM&HO) डॉ. एडी शर्मा यांनी म्हटले आहे, की 'तो (संबंधित मुलगा) ग्वाल्हेरला गेला की नाही, याचा शोध आम्ही घेत आहोत. कारण, तो ग्वाल्हेरला जाण्याऐवजी आपल्या घरी गेला, असे आम्हाला समजले आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी पिल्लूच्या घरी एक टीम पाठवण्यात आली होती आणि आता पिल्लूला मिर्गीचा त्रास आहे, की नाही, यासंदर्भात तपास केला जात आहे.
कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर
डॉ शर्मा यांनी म्हटले आहे, की एका अप्लवयीन मुलाला कोरोना लस कशी देण्यात आली. याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आधार कार्डनुसार पिल्लूचे वय 16 वर्षंच आहे आणि त्याची जन्मतारीख 1 जानेवारी 2005 आहे, असेही 'डॉ. शर्मा यांनी सांगितले.