नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची गेल्या २०८ दिवसांतील सर्वात कमी संख्या नोंदली गेली. कोरोना लसींचे ९५ कोटींवर डोस देण्यात आले आहेत.कोरोनाने जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ५० हजार ५८९ झाली आहे. या आजाराच्या नव्या रुग्णांची दररोजची आकडेवारी गेल्या १६ दिवसांपासून ३० हजारांपेक्षा कमी आहे. देशात ३ कोटी ३९ लाख ५३ हजार ४७५ कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ९७.९९ टक्के लोक या आजारातून बरे झाले. गेल्या मार्चपासूनचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. गेल्या चोवीस तासांत उपचाराधीन रुग्णांमध्ये ५,६७२ ने घट झाली. कोरोनाचा दररोजचा संसर्गदर १.४२ टक्के असून गेल्या ४१ दिवसांपासून हे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा दर आठवड्याचा संसर्गदर १.५७ टक्के असून, तो गेल्या १०७ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनातून आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ७१ हजार ९१५ जण बरे झाले आहेत. देशात आजवर ५८ कोटी २५ लाख ९५ हजार ६९३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, तर नागरिकांना कोरोना लसींचे ९५ कोटींवर डोस देण्यात आले. जगभरात कोरोनाचे २३ कोटी ८४ लाख रुग्ण असून त्यातील २१ कोटी ५६ लाख जण बरे झाले. अमेरिकेमध्ये ४ कोटी ५१ लाख कोरोनाबाधित आहेत व तिथे ७ लाख ३३ हजार जणांचा मृत्यू झाला.
Corona vaccination : देशात ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:14 AM