लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दरराेजची नवी रुग्णसंख्या तीन लाखांच्या दिशेने वाटचाल करीत असताना काेराेनावर मात करण्यासाठी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बैठकांचा धडाका लावला. त्यांनी उच्चाधिकाऱ्यांपासून औषध निर्मात्या कंपन्यांसाेबत दिवसभर बैठका घेऊन काेराेनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर पंतप्रधान माेदी यांनी तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रौढांसाठी लस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. लस उत्पादकांना ५० टक्के पुरवठा राज्य सरकार तसेच खुल्या बाजारात करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. त्यासाठी त्यांना आधी किंमत जाहीर करावी लागेल. उत्पादकांकडून राज्ये थेट लस खरेदी करू शकतील. महाराष्ट्र सरकारसह काही राज्यांनी अशी मागणी केंद्राकडे यापूर्वी केली हाेती. या निर्णयामुळे माेठ्या प्रमाणावर लसींच्या डाेसची गरज भासणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी कंपन्यांना केंद्र सरकारकडून
खासगी क्षेत्रालाही संधीn अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची परवानगी मागितली हाेती. उत्पादकांकडून थेट खरेदी करून कर्मचाऱ्यांना लस टाेचण्याची तयारी त्यांनी दर्शविली हाेती. n आता सरकारच्या परवानगीनंतर हा मार्गही माेकळा झाला आहे. काॅर्पाेरेट तसेच औद्याेगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच रुग्णालयांनाही आता थेट लस खरेदी करता येणार आहे. प्राेत्साहनही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ४५ वर्षांवरील पात्र नागरिकांना माेफत लसीकरणाची माेहीम सुरूच राहील.
साेनिया गांधींनी केली हाेती मागणीकाँग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी पंतप्रधान माेदींना पत्र लिहून लसीकरणासाठी वय घटविण्याची मागणी केली हाेती.
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. त्यावर सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.